मुंबई बातम्या

मुंबई महापालिका आयुक्त परदेशींची तडकाफडकी बदली, अश्विनी भिडे महापालिकेत – Times Now Marathi

मुंबई महापालिका आयुक्त परदेशींची तडकाफडकी बदली, अश्विनी भिडे महापालिकेत& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली
  • एस. चहल, आयएएस नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांची बदल मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
  •  ए. एल जराड अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई यांची बदली सचिव मदत व पुनर्वसन महसूल व वन विभाग या पदावर करण्यात आली आहे.  

मुंबई :  मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांची राज्य सरकारमध्ये बढती झाली असून त्याच्याकडे आता अपर मुख्य सचिव नगर विकास  हे पद असणार आहे. 

तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापक संचालक पदावरून त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. आरेतील मेट्रो कार शेड यावरून अश्विनी भिडे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. तसेच एका रात्रीत आरेतील झाडांची कत्तल केल्या प्रकरणी त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. 

  1. प्रवीण परदेशी आयुक्त मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव नगर विकास एक या पदावर

  2. एस. चहल, आयएएस नगर विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांची बदल मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

  3. मनोज सौनिक अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम यांचे नियुक्ती अप्पर मुख्य सचिव वित्त या पदावर तसेच किशोर राजे निंबाळकर यांची बदली सचिव सार्वजनिक बांधकाम या पदावर करण्यात आली आहे. 

  4.  ए. एल जराड अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई यांची बदली सचिव मदत व पुनर्वसन महसूल व वन विभाग या पदावर करण्यात आली आहे.  

  5.  संजीव जयस्वाल यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई या पदावर करण्यात आली आहे. 

  6. अश्विनी भिडे यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन्मुंबई या पदावर करण्यात आली आहे. 

  7.   ए. एल जहार्द,  मुंबई महापालिका  अतिरिक्त आयुक्त यांची बदली महसूल आणि वन सचिव येथे करण्यात आली आहे. 

  8.  जयश्री भोज अतिरिक्त महापालिका आयुक्त मुंबई यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई या पदावर करण्यात आली आहे. 

  9. के. डी. निंबाळकर  सचिव (अनुसंधान व विकास), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त केले गेले.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-bmc-commissioner-pravin-pardeshi-transferred-ashwini-bhide/292489