मुंबई: देशात कोरोनानं अक्षरशः कहर केला आहे. देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच अनेक नागरिक देशाच्या विविध भागांमध्ये अडकले आहेत. राज्य सरकारकडून या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी प्रयत्न केलं जात आहेत. मात्र मुंबईच्या राजस्थानी संघटनेनं एक कौतुकास्पद निणर्य घेतला आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत कामानिमित्त आलेले मजूर लॉकडाऊनमुळे इथेच अडकले आहेत. त्यामुळे मिळेल त्या वाहनांनी किंवा अगदीच वेळ आली तर पायी हे मजूर आपलं राज्य, आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यसरकारकडून तशी त्यांची जाण्याची सोयही केली जात आहे. मात्र मुंबईच्या राजस्थानी संघटनेनं एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
सर्वात मोठी खुशखबर ! गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून लालपरीची मोफत सेवा – अनिल परब
ज्या मुंबईनं आम्हाला पोसलं, आम्हाला रोजगार दिला, जी मुंबई आमची कर्मभूमी आहे, आम्हाला आमच्या मुंबईचा अभिमान आहे अशा मुंबईला आम्ही संकटकाळात सोडून जाणार नाही असं ‘जितो’ नावाच्या एका राजस्थानी संघटनेनं म्हंटलं आहे. तसंच आवश्यक नसेल तर राजस्थानच्या लोकांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी इतर मजुरांना केलं आहे.
मुंबई नेहमीच बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकाला आपल्यात सामावून घेते. मुंबईत आलेल्या प्रत्येकाला आईप्रमाणे पोसते. इथे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात. मुंबईत रोजगारासाठी आलेल्या प्रत्येकाची जन्मभूमी जरी वेगवेगळी असली तरी कर्मभूमी मुंबईच आहे. याच भावनेतुन जितो या संघटनेनं हा निर्णय घेतला असावा.
घरातून काम करणं झालंय सोपं; जिओने केली “ही” घोषणा
त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, ओरिसासारख्या राज्यातील नागरिक परत जात असताना राजस्थानच्या नागरिकांनी मुंबई आणि महाराष्ट्रासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. “मुंबईसह महाराष्ट्रला संकटकाळात सोडून जाणं चुकीचं आहे अशावेळी आपण महाराष्ट्रासोबत आहोत,” असं जितो संघटनेच्यावतीनं राकेश मुथा यांनी म्हंटलंय. त्यामुळे या संघटनेनं घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
jito a rajasthani organisation of migrant workes says we will not leave mumbai
Source: https://www.esakal.com/mumbai/jito-rajasthani-organisation-migrant-workes-says-we-will-not-leave-mumbai-290976