Updated : 28 Apr 2020 12:27 PM (IST)
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी निवड झालेले कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचा शपथविधी सोहळा आज (28 एप्रिल) सायंकाळी मुंबईत राजभवनामध्ये पार पडणार आहे. या छोटेखानी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांना शपथ देतील. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहतील.
Source: https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-dipankar-datta-to-take-oath-as-chief-justice-of-bombay-hc-765254