हे कर्मचारी पॉझिटीव्ह कसे आले आता याचाही तपास घेतला जात असून अजूनही कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले याचाही शोध सुरू आहे. या सर्वांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई : कोरोनाच प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे मुंबईमध्ये कोरना रुग्णांची संख्या एक हजारच्या वर गेली आहे. मुंबईच्या ताज हॉटेल मधील 22 कर्मचाऱ्यांना कोरनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आता पुढील उपचार सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाशी लढण्यासाठी सरकारला आर्थिक आणि इतर मदतीचा हात देण्यासाठी समाजातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात समोर आले होते. त्यामध्येच एक नाव रतन टाटा यांचेही नाव होतं. त्यांनी मुंबईमधील ताज हॉटेलमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. हे आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कोरोना बाधित रुग्ण सेवा करत आहेत. मात्र ताज हॉटेल मधील 22 कर्मचारी कोरोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटीव्ह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.
हे कर्मचारी पॉझिटीव्ह कसे आले आता याचाही तपास घेतला जात असून अजूनही कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले याचाही शोध सुरू आहे. या सर्वांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कोरोनाचा थैमान सध्या जगभर पसरलेला आहे आणि याचाच प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. देशामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत तर मुंबईमधील हे रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे हे लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळत आहे.
आतापर्यंत राज्यात 33 हजार कोरोना चाचणी करण्यात आल्या आहेत. यातील एकट्या मुंबईत 19 हजार टेस्ट करण्यात आल्या आहेत. राज्यातील एकही रुग्ण सुटता कामा नये, हा यामागील उद्देश. हे रुग्ण मुंबई, एमएमआर (MMR) आणि उपनगर या भागात 91% रुग्ण. यात 61% मुंबईत तर 20% पुण्यात आहेत. तर उर्वरित 10% एमएम आर (MMR) मध्ये आहे. ह्या तीन भागत सोडून उर्वरित राज्यात केवळा 9 टक्के कोरोना बाधित आहेत.
संबंधित बातम्या :
Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/twenty-two-corona-infected-people-found-in-taj-hotel-in-mumbai-759930