मुंबई : मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा ‘कोरोना’मुळे बळी गेला आहे. तर धारावीत एका डॉक्टरचीच ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. (Mumbai Worli Koliwada Death by Corona)
वरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. या वृत्तामुळे वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.
वरळी कोळीवाडा परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोळीवाडा परिसरात दूध वितरण, स्वयंपाक गॅस सिलेंडर पुरवठाही सुरु आहे.
धारावीत डॉक्टरलाच ‘कोरोना’
दुसरीकडे, मुंबईच्या धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण मिळाला. 35 वर्षीय डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णापासून डॉक्टरला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी
डॉक्टरच्या कुटुंबालाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तो राहत असलेली इमारतही मुंबई महापालिकेने सील केली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध सुरु आहे. (Mumbai Worli Koliwada Death by Corona)
One more #COVID19 case confirmed in Dharavi,Mumbai.A 35-yr-old doctor has tested positive.His family put in quarantine,they’ll be tested today for #Coronavirus.Brihanmumbai Municipal Corporation tracing his contacts.Building where he resides in Dharavi sealed by BMC.#Maharashtra
— ANI (@ANI) April 3, 2020
वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले असून, त्यांनी इमारत सील केली आहे
मुंबईतील 147 ठिकाणं सील
बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम क्वारंटाईमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.
हेही वाचा : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण
राज्यात काल दिवसभरात 88 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 54 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 235 झाली आहे.
राज्यात आतापर्यंत 24 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहेत. मुंबईत काल दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे.
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 235 | 14 | 17 |
पुणे (शहर+ग्रामीण) | 45 | 9 | 2 |
पिंपरी चिंचवड | 15 | 10 | |
सांगली | 25 | ||
नागपूर | 16 | 4 | |
कल्याण-डोंबिवली | 10 | ||
नवी मुंबई* | 13 | 1 | |
अहमदनगर | 17 | 1 | |
ठाणे* | 8 | ||
वसई-विरार* | 6 | 1 | |
यवतमाळ | 4 | 3 | |
बुलडाणा | 5 | 1 | |
सातारा | 2 | ||
पनवेल* | 3 | ||
कोल्हापूर | 2 | ||
उल्हासनगर * | 1 | ||
गोंदिया | 1 | ||
औरंगाबाद | 3 | 1 | |
सिंधुदुर्ग | 1 | ||
नाशिक | 1 | ||
पालघर | 1 | 1 | |
रत्नागिरी | 1 | ||
जळगाव | 1 | 1 | |
हिंगोली | 1 | ||
उस्मानाबाद | 1 | ||
इतर राज्य (गुजरात) | 1 | ||
एकूण | 423 | 41 | 24 |
(Mumbai Worli Koliwada Death by Corona)
कमेंट करा
Source: https://www.tv9marathi.com/mumbai/mumbai-worli-koliwada-koli-leader-death-by-corona-dharavi-doctor-detected-with-covid19-202360.html