मुंबई – कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तरी देखील राज्यात आणि देशांत क्वारंटाईन केलेले नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. मात्र आता या क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचा, बाधितांचा ट्रॅक यंत्रणेला ठेवता येणार असून यासाठी आयआयटी बॉम्बे पुढे सरसावली आहे. आयआयटी बॉम्बेच्या शिक्षकांच्या टीमने क्वारंटाईन नावाच्या अॅप निर्मिती केली असून या साहाय्याने संबंधित अधिकृत यंत्रणेला क्वारंटाईन केलेली व्यक्ती नेमकी कोणत्या एरियात आहे? ती व्यक्ती त्याला नेमून दिलेल्या परिसरातच आहे की इतरत्र कुठे याची माहिती मिळू शकणार आहे.
खरे तर या अॅपचा वापर हा जे लोक कोरोनाने बाधित नाहीत त्यांना अलर्ट देण्यासाठी जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यांना आपण क्वारंटाईन लोकांच्या संपर्कात आलो याची माहिती मिळणार असल्याने ते जास्त सतर्क राहू शकतील अशी माहिती टीमचे प्रमुख मंजेश हनवल यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक बाधित रुग्ण त्यांना क्वारंटाईन केलेले असतानाही नियमांचा भंग करून इतरांचे आरोग्य धोक्यात घालतानाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यांच्या जीवाला यामुळे धोका आहेच मात्र यामुळे इतरांना संसर्ग होऊन हा आजार पसरण्याची शक्यता टाळता येईल. संबंधित रुग्णाच्या हालचाली लक्षात घेऊन यंत्रणेला मुनष्यबळाचा वापर करून संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे अॅप उपयुक्त असल्याची माहिती त्यांनी दिली.
आयआयटी बॉम्बेचे मंजेश हनवल, गणेश रामकृष्णन, यांनी या अॅपची निर्मिती केली असून यासाठी त्याना आयआयटीचे माजी विद्यार्थी अस्विन गमी आणि पीएचडी स्कॉलर आयुष्य महेश्वरी, अधिकारी अर्जुन साबळे यांचीही मदत मिळाली आहे. सहज वापरता येणारे अॅप क्वारंटाईन व्यक्तीच्या किंवा बाधित रुग्णाच्या मोबाईल फोनवर अधिकृत यंत्रणेद्वारे डाउनलोड करून घेता येणार आहे. या यंत्रणेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोबाईलवर वेळोवेळी जीपीएस सूचना येत राहणार आहेत. संबंधित वापरकरताय व्यक्तीने त्याला नियोजित परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास याचा अलर्ट तात्काळ मिळणार असून त्याला वेळीच रोखता येऊ शकणार आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून ‘कानउघडणी’; गरज नसताना गर्दी कराल तर… @CMOMaharashtra#CoronaUpdate#Maharashtrahttps://t.co/KFjxBcrnSr
— Lokmat (@MiLOKMAT) March 29, 2020
क्वारंटाईन सेफ
आयआयटी बॉम्बेच्या प्राचार्य भास्करन रमण आणि कामेश्वरी छेब्रॉलू यांनी मिळून आणखी एक सेफ नावाचे अॅप्लिकेशन तयार केले आहे. जे क्वारंटाईन व्यक्ती त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन किंवा मर्यादा पाळतात की नाही यावर लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे.
आयआयटी बॉम्बेच्या या दोन्ही अॅप्लिकेशन्सची माहिती या संस्थेकडून आणि संबंधित डिपार्टमेंटकडून महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आयआयटी बॉम्बेकडून देण्यात आली आहे. ती मिळाल्यानंतर याचा वापर सुरु करण्यात येऊन लोकांच्या उपयोगात आणता येईल असे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : इटलीत परिस्थिती गंभीर! कोरोनाशी लढणाऱ्या 51 डॉक्टरांना गमवावा लागला जीव
Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार
Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू
Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
English summary :
IIT Bombay releases the CORONTINE App to assist contact tracking and monitoring of potential carriers
Web Title: Coronavirus IIT Bombay releases the CORONTINE App SSS
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.
Source: https://m.lokmat.com/mumbai/coronavirus-iit-bombay-releases-corontine-app-sss/