राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११६ वरून १२२ इतकी झाली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना संसर्गातून करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात आणखी एक करोनाचा रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
करोनामुळे एनपीआरची प्रक्रिया पुढे ढकलली
महाराष्ट्रात आज दुपारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११६ इतकी होती. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले होते तर मुंबईत ४ रुग्ण आढळून आले होते. दुपारनंतर त्यात आणखी सहा जणांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या १२२ पर्यंत पोहचली आहे.
कर्फ्यूतही शिवभोजन सुरू; रुग्णांना मोठा आधार
दरम्यान, करोनाचे १४ रुग्ण आता पूर्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्याच्या प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे पुण्यात सर्वप्रथम करोनाबाधित आढळलेलं दाम्पत्य आज बरे होऊन आपल्या घरी परतले आहे. नायडू रुग्णालयात या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. या दाम्पत्याने एक निवेदन काढून नायडू रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ, राज्य सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचेच आभार मानले आहेत. या संकटकाळात सर्वांनीच सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही या दाम्पत्याने केले आहे.
‘त्या’ रुग्णालयांचे परवाने रद्द; सरकारचा इशारा
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-update-total-cases-in-maharashtra-rise-to-122/articleshow/74812196.cms