राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्य सरकारनं खबरदारी म्हणून अनेक निर्बंध उपाय योजले आहेत. मुंबई महानगर प्रदेशसह चार शहरे बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. करोनाच्या भीतीनं या महानगरांमधील लोक आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. रेल्वे स्थानके, बस थांबे आणि अनेक ठिकाणी गावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी दिसत आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, संध्याकाळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सीएसएमटी स्थानकाला भेट दिली. रेल्वे स्थानकांवरील गर्दी टाळा, असं आवाहन त्यांनी केलं. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आता दिसू लागला आहे. लोकलमध्ये आता २० ते २५ टक्के गर्दीच आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या सूचना त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
Video: रेल्वे स्थानकांवरील गर्दीबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री? पाहा #coronavirus #RajeshTope #CSMT https://t.co/ZtTSBcp0Gw
— Maharashtra Times (@mataonline) 1584803011000
राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त; रुग्णसंख्या ६४वर
अमेय वाघच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का
औरंगाबादेत करोनाग्रस्ताचा रीपोर्ट निगेटिव्ह
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-in-mumbai-health-minister-rajesh-tope-visit-at-chhatrapati-shivaji-maharaj-terminus/articleshow/74750055.cms