आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. राज्यात काल ६४ रुग्ण होते. परंतु आज पुन्हा दहा रुग्ण आढळल्याने हा आकडा ७४वर गेल्याचं टोपे यांनी सांगितलं. या १० रुग्णांपैकी पाच रुग्ण हे परदेशातून आलेले असून इतर पाच रुग्णांना संपर्कामुळे करोनाची लागण झाल्याचं टोपे यांनी सांगितलं. पुण्यात चार पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रुग्ण महिलेच्या बहिणीचा पती, तिची बहीण, तिचा मुलगा आणि बहिणीची मुलगी अशा चार जणांचा समावेश आहे. रुग्ण महिलेच्या पती आणि त्यांच्या मुलीला तापाची लक्षणे आहेत. त्यांना खासगी रुग्णालयातून आता नायडू रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तसेच एका ६३ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मुंबईच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. या व्यक्तीला अनेक व्याधी होत्या. त्यातच त्यांना करोनाची लागण झाल्याने ते दगावल्याचंही टोपे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आज आढळलेल्या दहाही रुग्णांच्या संपर्कातील लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन केलं जाणार आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांना शोधून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राज्यातील करोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने आरोग्य यंत्रणांपुढील चिंताही वाढली आहे.
कोरोनाचे राज्यात आज एकूण 10 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची स्ख्या 74 झाली आहे.… https://t.co/gRXLmRtErx
— Rajesh Tope (@rajeshtope11) 1584860469000
‘जनता कर्फ्यू’मध्ये वाढ होणार; राऊत यांचे संकेत
महाराष्ट्र Live: मुंबई थांबली; रस्ते, लोकल ओस
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/10-more-people-have-tested-positive-for-coronavirus-in-maharashtra-says-rajesh-tope/articleshow/74757198.cms