मुंबई बातम्या

करोना: जाणून घ्या मुंबईतील तपासणीचे अपडेट्स – Maharashtra Times

करोना: जाणून घ्या मुंबईतील तपासणीचे अपडेट्स
मुंबई: मुंबई महापालिकेने करोनाच्या साथीच्या अनुशंगाने होत असलेल्या व्यापक वैद्यकीय तपासणीचा तपशील जारी केला असून १८ जानेवारीपासून एकट्या मुंबई विमानतळावरच २ लाख १७ हजार ६३६ जणांची तपासणी करण्यात आली असून मुंबई व ठाण्यात मिळून १८ जानेवारीपर्यंत करोनाचे चार रुग्ण आढळले आहेत.

मुंबईतील तीन व ठाण्यातील एक अशा चारही करोना बाधित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबईत राहत असलेल्या रुग्णाच्या परिसरातील ४६० घरांची पालिकेच्या आरोग्य विभागाने पाहणी केली. त्यांतील एकही व्यक्ती करोना बाधित नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

करोना: टोपेंनी सांगितला ‘हा’ आरोग्यमंत्र

गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांना आयसीयू सेवा मिळण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात सोय करण्यात आली आहे. तर बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांना वेगळे ठेवण्यासाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात सोय करण्यात आली आहे. ३० खाटांचा विलगीकरण कक्षही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

करोना: आता आव्हान मानसिक आरोग्याचे

तपासणीचे अपडेट्स

– १८ जानेवारीपासून आतापर्यंत मुंबई विमानतळावर २ लाख ७ हजार ६३६ प्रवाशांची तपासणी.

– करोना संशयित २३८ प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात केले दाखल.

– आतापर्यंत २३८ पैकी २३१ जणांना करोनाची लागण झाली नसल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट.

– मुंबईतील ३ व ठाण्यातील एकाला करोनाची लागण. चौघांवरही कस्तुरबात उपचार सुरू आहेत.

– करोनाची तीव्र लक्षणे आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील ७ जणांवर कस्तुरबातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. करोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांना घरातच पुढील १४ दिवस वेगळं राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

२३३ खाटांची सोय

कस्तुरबा रुग्णालय- ७८

एचबीटी रुग्णालय- २०

भाभा रुग्णालय कुर्ला- १०

भाभा रुग्णालय वांद्रे- १०

राजावाडी- २०

फोर्टिस- १५

बीपीटी रुग्णालय- ५०

बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रुग्णालय- ३०

करोना: हिंदुजात घबराट; ८० जण निरीक्षणाखाली

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/covid-19-updates-2-lakh-travellers-screened-at-mumbai-airport-since-18-january/articleshow/74622160.cms