एक पोलीस जीवाची पर्वा न करता थेट खाली लाट रोधक क्युब्सवर उतरला.
- Share this:
मुंबई, 9 मार्च : लोकांच्या मदतीला धावून जाणारा खाकी वर्दीतला माणूस आणि देव आपण अनेकदा पाहयला आहे. त्याचाच प्रत्यय मुंबईत पुन्हा एकदा आला आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट येथील क्वीन नेकलेस वरील हॉटेल मरीना प्लाजा समोरील लाटा रोधक क्यूब मधून एका भटक्या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज येत होता.
या भागात येणाऱ्या अनेक पर्यटकांना कुत्र्याचा आवाज येत होता. मात्र कोणीही त्या कुत्र्याला बाहेर काढण्यास पुढे सरसावले नाही. त्याचवेळी आपल्या पाळीव कुत्र्यांना फेरफटका मारायला आणणाऱ्या एका तरुणाचे लक्ष त्या कुत्र्याकडे गेले. त्याने आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा काढला आणि त्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी धडपड करु लागला. पण कोणीही त्या तरुणाच्या मदतीला आले नाही.
तिथून जाणाऱ्या 4 खाकी वर्दीतील पोलिसांना या तरुणाची धडपड दिसली आणि ते तात्काळ त्या तरुणाची मदत करण्यास पुढे सरसावले. एक पोलीस जीवाची पर्वा न करता थेट खाली लाट रोधक क्युब्सवर उतरला. त्या कुत्र्याला उचलून वर कठड्यावर ठेवले आणि त्या कुत्र्याची सुटका केली.
हेही वाचा- कोण म्हणतं मंदी आहे? मुंबईत विकला जातोय 66 कोटींचा एक फ्लॅट; सर्वांत महाग प्रॉपर्टीची किंमत वाचून व्हाल अवाक
क्युब्समध्ये कुत्र्याचा पाय अडकल्याने त्याच्या पायाला इजा झाली आहे. पोलिसांची ही माणुसकी पाहून सोशल मिडियावर याबाबतचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
First Published: Mar 10, 2020 08:08 AM IST
Source: https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-police-work-story-latest-updates-mhas-440527.html