मुंबई: जोगेश्वरी परिसरात गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी; आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू… https://t.co/DFENMac4Sb
— Maharashtra Times (@mataonline) 1583367129000
जोगेश्वरी परिसरात गोदाम असून, आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीनं रौद्ररुप धारण केलं आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी सात बंबांसह घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षांची सक्तमजुरी
जालन्यातील हॉटेलला आग
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/massive-fire-broke-out-in-a-godown-in-jogeshwari-area-of-mumbai/articleshow/74484538.cms