पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर भीषण अपघात एकून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली लघुशंकेसाठी थांबलेल्या पाच जणांना आयशर टेम्पो ने चिरडले आहे. तर नशीब बलवत्तर असल्याने एक जण बचावला आहे. दरम्यान, टेम्पो चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप मयत आणि जखमी व्यक्तीची नाव समजू शकलेली नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई या द्रुतगतीमार्गावरून जुन्या महामार्गाकडे वळताना आयशर टेम्पो क्रमांक एम.एच-१२ सी.व्ही-०२४३ याने सहा जणांना चिरडले. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास खंडाळा अंडा पॉईंट येथे ही घटना घडली. सहा जण तीन दुचाकीवरून जात असताना तिथे लघुशंकेसाठी थांबलेले होते. अचानक भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांना चिरडले. त्यानंतर तात्काळ महामार्गावरील पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. पैकी चार जनांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. अंडा पॉईंट येथील अत्यंत धोकादायक वळण असलेल्या दस्तुरी येथे हा अपघात झाला असून टेम्पो चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. मयत आणि जखमी हे तळेगाव दाभाडे येथील असून कामगार आहेत. त्यांना सुट्टी असल्याने ते फिरायला गेले होते. तळेगाव येथे परतत असताना लघुशंका आल्याने ते रस्त्याच्या कडेला थांबले होते. तेव्हा अचानक काळाने घाला घातला.
First Published on March 2, 2020 2:39 am
Source: https://www.loksatta.com/pune-news/five-killed-in-accident-on-pune-mumbai-highway-abn-97-2098073/